विजापूर येथील रामनवमी उत्सव समितीच्या वतीने गो-संरक्षण अभियानांतर्गत सही मोहीम राबवून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल आणि केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले.


समितीचे अध्यक्ष उमेश वंदाल म्हणाले की, गाय हे बहुसंख्य हिंदूंचे श्रद्धास्थान असून तिचे संरक्षण करणे केंद्र व राज्य सरकारचे कर्तव्य आहे. गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ आणि ‘राज्यमाता’ घोषित केले पाहिजे. विजापूर शहर व जिल्ह्यात बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये गोहत्या होत असल्याचा आरोप करत, हे कत्तलखाने तत्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

देशभरातून ही मागणी जोर धरत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यासाठी ही सही मोहीम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments