विजापूर शहरात गवळी समाजाच्या वतीने महालक्ष्मी यात्रेचे अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात आयोजन करण्यात आले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी महालक्ष्मी देवीचा पंचामृत अभिषेक, महापूजा आणि आरती पार पडली. त्यानंतर कवळी गेट येथील कालिकादेवी मंदिरापासून मलगम्मा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गवळी समाजातील भाविक, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुपारी हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच यात्रेच्या निमित्ताने महिलांसाठी विविध खेळ, संगीताचा कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Recent Comments