Dharwad

धारवाडमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीत जनावरे होरपळली

Share

धारवाड तालुक्यातील मुम्मीगट्टी गावात मध्यरात्री लागलेल्या आगीत १२ जनावरे जिवंत जळाली असून दोन गोठे पूर्णपणे भस्मसात झाले आहेत.

ही दुर्घटना स्थानिक शेतकरी सागर असुंडी आणि धरणेंद्र असुंडी यांच्या गोठ्यांमध्ये घडली. आगीत धरणेंद्र यांच्या मालकीच्या दोन गाई, तीन म्हशी, दोन वासरू आणि सागर यांच्या तीन म्हशी व दोन रेडके अशा एकूण १२ जनावरांचा दर्दैवी मृत्यू झाला.

आगीमुळे गोठ्यात साठवून ठेवलेला ४ ट्रॅक्टर चाराही पूर्णपणे जळून खाक झाला असून यामुळे दोन्ही शेतकरी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags: