Belagavi

बेळगावमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

Share

बेळगाव मधील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एनएसएस आणि ब्रह्माकुमारीज युथ विंग यांच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना राजयोगिनी बीके अनुराधा म्हणाल्या, बदलत्या काळानुसार प्रत्येकाने नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असून, कौशल्य संपन्न व्यक्ती कधीही इतरांवर अवलंबून राहत नाही, भारतात तरुणांची संख्या मोठी असून त्यांचे कौशल्यच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्‍याच्‍या तणावपूर्ण वातावरणात प्रत्‍येकाला ध्‍यानाची अत्‍यंत गरज असल्‍याचे सायन्स विभागाच्या प्रमुख वीणा पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात बीके महांतेश यांनी ब्रह्माकुमारीज संस्थेची माहिती दिली, तर बीके साधना यांनी उपस्थितांना ध्यानधारणा करवून शांततेचा अनुभव दिला. तसेच बीके श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.

या प्रसंगी एनएसएस समन्वयक विद्याधर लाटकर, जाफर मुल्ला आणि महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी दीपा तिम्मापूर हिने केले, तर वीणा पाटील यांनी आभार मानले.

Tags: