Dharwad

धारवाडच्या वेशीवर टमटम उलटून सात जण जखमी

Share

धारवाड परिसरातील अम्मिनभावीजवळ मजुरांना घेऊन जाणारी टमटम उलटल्याने सात जण जखमी झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील हुली गावातून मजुरांना शेतातील कामासाठी टमटममधून अम्मिनभावी गावाकडे आणले जात होते. दरम्यान, अम्मिनभावी गावाजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टमटम उलटली. या अपघातात टमटममधील सात मजूर जखमी झाले असून, त्यांना तातडीने धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: