Belagavi

‘एसडीएम’ पत्रकारिता विभागप्रमुखपदी डॉ. हंपेश के.एस.

Share

उजिर येथील श्री धर्मस्थळ मंजुनाथेश्वर स्वायत्त महाविद्यालयाच्या पदव्युत्तर पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या प्रमुखपदी सहयोगी प्राध्यापक डॉ. हंपेश के.एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विश्वनाथ पी. यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. डॉ. हंपेश यांनी २००९ मध्ये या विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एनआयआरएफ’ आणि ‘नॅक’ मूल्यांकनात विभागाला विशेष स्थान मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१४ मध्ये त्यांनी कुवेम्पू विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी संपादन केली असून, त्यांनी आतापर्यंत अनेक शोधनिबंध आणि पुस्तकांचे लेखन केले आहे.

Tags: