कागवाड येथील केएलई पदवीपूर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष पियूसी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसेच क्रीडा, सांस्कृतिक आणि एनएसएस उपक्रमांचे उद्घाटन संपन्न झाले. यात विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.


अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास मालकाला २५ हजार दंड व तुरुंगवास होईल, अशी माहिती कागवाडचे पीएसआय राघवेंद्र खोत यांनी दिली. तसेच, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवान वाहन चालवणे आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
केएलई संस्थेच्या राज्यभरात ३१७ हून अधिक शाखा असून १.५० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. या नामांकित संस्थेत शिकण्याची संधी मिळणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद पाटील यांनी म्हटले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यवस्थापन समितीचे सदस्य ईरगौडा पाटील, सातगौडा पाटील, मादगौडा पाटील, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. स्वागत के. ए. माळी यांनी , प्रास्ताविक पी. एस. रत्तू व एम. एस. मठपती यांनी, तर आर. डी. पवार यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments