महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांची जीवनवाहिनी असलेल्या या धरणात केवळ १५ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने, कृष्णा नदीच्या खोऱ्यातील भागात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

१०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या भव्य जलाशयात सध्या अत्यंत कमी पाणी शिल्लक राहिले आहे. या चिंताजनक परिस्थितीमुळे कृष्णा नदीच्या तीरावरील उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी थेट कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या माध्यमातून कर्नाटकात प्रवेश करते. हे पाणी प्रामुख्याने बेळगाव, विजापूर आणि बागलकोट सह विविध भागांतील लाखो लोकांची तहान भागवते.

दरवर्षी उन्हाळ्यात किंवा मान्सून लांबणीवर पडल्यास उत्तर कर्नाटकातील या भागांमधील नद्या कोरड्या पडतात आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडून घेत असे. मात्र, यंदा कोयना धरणातच केवळ १५ टीएमसी पाणी असल्याने महाराष्ट्रातून पाणी मिळणे कठीण मानले जात आहे. यामुळे बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शहरी भागांत पिण्याच्या पाश्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.


Recent Comments