कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कागवाड-शेडबाळ रस्त्यावर कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शेडबाळ येथील रहिवासी असलेल्या तुळसाबाई चौगुले (६५) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.

तुळसाबाई चौगुले या आपल्या मुलासोबत बाईकवरून कागवाडहून शेडबाळ येथील आपल्या घराकडे परतत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



Recent Comments