Kagawad

मंत्रीपद मिळाले तरी आनंद आणि नाही मिळाले तरी आनंद : आम. कागे

Share

कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मंत्रीपद मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य करत पक्ष माझ्या कामाची दखल घेऊन मला मंत्रीपद देईल, मी स्वतःहून पदाची मागणी करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कागवाड येथे पत्रकारांशी बोलताना राजू कागे यांनी सांगितले की, मंत्रीपद मिळवण्यासाठी मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. मला मंत्रीपद मिळाले तरी आनंद आहे आणि नाही मिळाले तरीही मी आनंदीच राहीन. कोणतीही जबाबदारी मिळाल्यास ती सक्षमपणे सांभाळण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील १४० हून अधिक आमदारांना मंत्री होण्याची इच्छा असते, मात्र मंत्रीमंडळात केवळ ३३ जणांनाच संधी मिळू शकते, मी ‘वन मॅन शो’ असून वाघ नेहमी एकटाच असतो, अशा शब्दांत राजू कागे यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला.

Tags: