Raibag

रायबागमध्ये रिक्षा आणि बाईकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या बोम्मनाळ येथील एकाच कुटुंबातील तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. रिक्षा आणि बाईक यांच्यात झालेल्या धडकेमुळे हा अपघात झाला.

रायबाग रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा आणि बाईक यांच्यात धडक झाली. या अपघातात बाईकस्वार महांतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि सहा महिन्यांचे बाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: