Dharwad

विद्यार्थी आत्महत्या प्रकरण; धारवाडच्या विद्यागिरी पोलिसांविरोधात संताप

Share

धारवाडमधील विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या आदित्य या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय वीरशैव-लिंगायत महासभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी धारवाडच्या जिल्हाधिकारी आर. स्नेहल यांची भेट घेऊन तक्रार मांडली. विद्यागिरी पोलिसांनी आदित्यवर गांजा सेवन केल्याचा खोटा आरोप करून त्याची वैद्यकीय तपासणी केली होती. वैद्यकीय अहवालात आदित्यने कोणतेही अमली पदार्थ घेतले नसल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही पोलिसांनी त्याला त्रास देऊन पैशांची मागणी केल्यामुळे आदित्यने नैराश्यातून आत्महत्या केली, असे महासभेने म्हटले.

या प्रकरणी मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत द्यावी आणि दोषी पोलिसांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सरकारने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास, समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि मठाधीशांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Tags: