केंद्र सरकारच्या अपयशामुळे नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असून, लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात तरुणांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन कामगार मंत्री संतोष लाड यांनी केले आहे.

धारवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संतोष लाड म्हणाले की, विविध विभागांतील रिक्त जागा भरण्यासाठी ज्याप्रमाणे तरुणांनी लढा दिला, तसाच लढा आताही हवा आहे. नीट पेपर फुटीमुळे २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले असून त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली आहे. गेल्या १० वर्षांत ८९ परीक्षांचे पेपर फुटले, त्यापैकी २१ परीक्षा केंद्राच्या अखत्यारीत होत्या, यावर केंद्रातील मंत्री मौन बाळगून आहेत.

राज्य सरकार तरुणांचा आवाज दाबत नसून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकशाहीत मागणीसाठी लढा देण्याचा अधिकार सर्वांना आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाला असून १२,१२२ बनावट खाती तयार करून पैशांची अफरातफर झाल्याचा दावा कॅग अहवालात करण्यात आला आहे, असे संतोष लाड यांनी म्हटले.


Recent Comments