भीषण उन्हाळ्यामुळे चिक्कोडी आणि हुक्केरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तावडीने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते बी. आर. पाटील यांनी केली आहे.

चिक्कोडी तालुक्यातील करगाव ग्रामपंचायत परिसरात तहसीलदार राजेश बुर्ली यांना निवेदन दिल्यानंतर बी. आर. पाटील बोलत होते. मान्सूनच्या कमतरतेमुळे दोन्ही तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे, असे बी. आर. पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक सध्या मोठ्या संकटात आहेत. अनेक ठिकाणी कूपनलिका आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, असे आवाहन बी. आर. पाटील यांनी केले.


Recent Comments