Kagawad

श्री पद्मावती देवी मंदिराचे सभागृह आणि यात्री निवासच्या उदघाटनाचे आयोजन

Share

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या उगार बुद्रुक येथील श्री पद्मावती देवी मंदिरासमोर नवनिर्मित भव्य सभागृह आणि यात्री निवासाचा उद्घाटन सोहळा मंगळवार, ५ मे रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे.

या सोहळ्यासाठी कंबदहल्ली, सोंडा स्वादी आणि राजस्थान येथील तिजारा जैन मठाच्या भट्टारक महास्वामीजींचे दिव्य सान्निध्य लाभणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य जैन समाज असोसिएशनचे उपाध्यक्ष शितलगौडा पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार राजू कागे, डी. सुरेंद्र कुमार, आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अभय पाटील यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्री पद्मावती देवी आराधना महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्याला सर्व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

यावेळी मंदिराचे भक्त भरतेश खंडेराजुरी, अण्णासाहेब नांदगावे, दादा अळप्पन्नावर, मनोहर चौगुले, वृषभ पाटील, अभियंता आदेश वसववाडे, दीपक पाटील, अण्णागौडा पाटील, शीतल खवटकोप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Tags: