मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध डीके शिवकुमार यांच्यात ओव्हरटेक राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. प्रथम उपमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली, तर त्यानंतर डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या आधी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.
एकिकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंत्रिमंडळ फेररचनेसाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे डीके शिवकुमार हे याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती आहे तशीच ठेवण्यासाठी डीके शिवकुमार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डीके शिवकुमार म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणे स्वाभाविक आहे. राज्यात कोणतेही राजकीय पंख फडफडलेले नाहीत. पार्टी आहे म्हणून आम्ही सगळे आहोत,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.


Recent Comments