Uncategorized

बालिका आदर्शला दुहेरी मुकुट, संत मीरा,सेट झेवियर्स विजेते

Share

बेळगाव ता, 1. कॅम्पमधील शाळेच्या मैदानावर कॅन्टोन्मेंट शाळा आयोजित शहर तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला तर संत मीरा व सेट सेंट झेवियर्स ही विजेते ठरले.
प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतील सेंट झेवियर्स शाळेने संत मीरा शाळेचा 3-1 असा पराभव केला.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात बालिका आदर्शने सेंट झेवियस शाळेचा 4-1 असा पराभव केला माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 6-4असा पराभव केला तर मुलींच्या गटातील अंतिम लढतील बालिका आदर्श शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 8 -0 असा पराभव केला
स्पर्धेच्या उद्घाटनाला व बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव कॅन्टोन्मेंट सीईओ सुदाम मंचलवार, कॅन्टोन्मेंट शाळेच्या मुख्याध्यापिका निशा गावडे परशुराम बिरजे, राजू कदम शामलाल धनवर शहराच्या पीईओ जहिदा पटेल हणमत मास्तीहोळी, एच व्ही रोगी,
मार्गेरेट डिसोजा, प्रकाश बजत्री, चंद्रकांत पाटील जयसिंग धनाजी उमेश मजुकर उमेश बेळगुदकर, येस्ताराणी,ज्युलेट फर्नांडिस या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेते संघ आगामी होणाऱ्या जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत

Tags: