बेळगाव, ता. 01 : अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत आणि विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत
संत मीरा बेळगाव, आर व्ही के बेंगळूर आणि शास्त्री पदवीपूर्व कॉलेज म्हैसूर संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजेतेपद पटकाविले.

14 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत आर व्ही के बेंगलोर संघाने संत मीरा बेळगाव संघाचा 7-5 असा पराभव केला.
मुलींच्या गटातील अंतिम लढतील संत मीरा बेळगावने आर व्ही के बऴळारी संघाचा 5-3 असा पराभव केला
17 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने आर व्ही के बळ्ळारीचा 10- 4 असा पराभव केला मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने आरव्हीके बेंगलोर संघाचा 6-2 असा पराभव केला तर 19 वर्षाखालील मुलांच्या अंतिम लढतीत शास्त्री पदवीपूर्व कॉलेज म्हैसूर ग्रामीणने हरी विद्यालय म्हैसूर अर्बनचा 12–4 असा पराभव केला तर मुलींच्या गटातील अंतिम लढतील शास्त्री पदवीपूर्व कॉलेज म्हैसूर ग्रामीणने आर व्ही के बेंगलोर संघाचा 8-6 पराभव करीत विजेतेपद पटकाविले.स्पर्धेच्या बक्षिस समारभाला संत मीरा गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर मुख्याध्यापिका आरती पाटील भातकाडे शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा ए सी

जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी अशोक शिंत्रे , विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव तसेच विद्याभारतीचे शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेसाठी पंच म्हणून जयसिंग, धनाजी, प्रथमेश, उमेश, मजुकर, बापू देसाई, प्रवीण पाटील, सोहेल बिजापुरे, श्रेयस खांडेकर, अनुराधा पुरी आणि शिवकुमार सुतार यांनी पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पेटकर यांनी केले, तर चंद्रकला यांनी आभार मानले.


Recent Comments