Belagavi

न्यूझीलंडमध्ये बेळगावच्या शेफ चेतन पंगम यांची कमाल

Share

बेळगावच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले शेफ चेतन पंगम यांनी न्यूझीलंडमध्ये स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करून सर्वोच्च खाद्यपदार्थ स्पर्धा जिंकत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

न्यूझीलंडमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ क्षेत्रात बेळगावचे शेफ चेतन पंगम यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. भारतीय संस्कृती आणि न्यूझीलंडच्या स्थानिक चवींचा मेळ घालत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या चेतन यांनी ‘बेलबर्ड ईटरी’ रेस्टॉरंटच्या माध्यमातून उद्योजक म्हणून यश मिळवले आहे.

बेळगावच्या सेंट झेव्हियर्स आणि मिलिटरी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेतन यांनी बेंगळुरू येथील के. एल. ई. महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली. ओबेरॉय, ताज आणि लीला यांसारख्या भारतातील आघाडीच्या हॉटेल्समध्ये अनुभव घेतल्यानंतर २००२ मध्ये ते न्यूझीलंडला गेले. तिथे दीर्घकाळ काम केल्यानंतर आता ते स्वतःच्या रेस्टॉरंटचे मालक बनले आहेत.

न्यूझीलंडमधील प्रतिष्ठित ‘बर्गर व्हेली’ स्पर्धेत त्यांनी सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला असून ‘ लॅम्ब ॲम्बेसेडर शेफ’ म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. त्यांचा ‘बीफ वेलिंग्टन’ हा पदार्थ देशभर लोकप्रिय ठरला आहे. याशिवाय, त्यांच्या मुलानेही याच स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून या कुटुंबाने आचारी क्षेत्रात नवा मैलाचा दगड स्थापन केला आहे.

Tags: