Vijayapura

कण्हेरी श्रींच्या प्रवेशबंदीवरून विजापूरमध्ये तीव्र संताप

Share

महाराष्ट्र्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरी अदृश्य काडसिद्धेश्वर मठाच्या स्वामीजींना विजापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करणे निंदनीय आहे, असे मत भाजपचे नेते उमेश वंदाळ यांनी व्यक्त केले. विजापूर शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

विजापूर जिल्ह्यामध्ये स्वामीजींच्या प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी उद्या भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. उद्या सकाळी १० वाजता विजापूर शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

कण्हेरी स्वामीजींनी देशासाठी आदर्श निर्माण केला आहे. गरीब मुलांना गुरुकुल शिक्षण देणे, कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणे, यासह विविध विकासकामे ते करत आहेत. अशा व्यक्तींना प्रवेशबंदी घालणे योग्य नाही. त्यामुळे ही प्रवेशबंदी त्वरित हटवावी, या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने भाविक आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उमेश वंदाळ यांनी केले.

Tags: