Banglore

काँग्रेसमध्ये सर्व आलबेल; नेतृत्वबदलाच्या चर्चांना पूर्णविराम : सुरजेवाला

Share

काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आज पुन्हा एकदा बेंगळुरूला पोहोचले असून, त्यांनी दुसऱ्या टप्प्यात आमदारांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वकाही व्यवस्थित असल्याचे सांगत, आजच्या बैठकीबाबतची सविस्तर माहिती उद्या दिली जाईल, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

राज्याचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी बेंगळुरू येथील केपीसीसी कार्यालयाला भेट दिली असून, ते आमदारांसोबत बैठका घेत आहेत. ही आमदारांसोबतच्या चर्चेचा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात काही आमदारांनी आपली मते मांडली होती, तर आज सुरजेवाला २४ आमदारांशी संवाद साधणार आहेत. आमदारांकडून त्यांना ‘रिपोर्ट कार्ड’ देखील मिळण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत ते ६० हून अधिक आमदारांची मते जाणून घेतील. सर्व परिस्थिती समाधानकारक असून, याबाबत उद्या सविस्तर माहिती देईन, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

Tags: