जारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कागवाड येथील श्री केदारलिंग (ज्योतिबा) मंदिराचा कळसारोहण सोहळा रविवारी होणार आहे.
त्यानिमित्त शनिवारी सकाळी शहरातील मुख्य मार्गावरून कलशांची मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीत शेकडो सुवासिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या . यावेळी भगवान जोतिबाचा पालखी सोहळा पार पडला.

उद्या रविवारी सकाळी 11 वाजता म्हैसाळ हिरेमठ संस्थानचे 108 वे सम्राट शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते कळसारोहण कार्यक्रम होणार आहे . . यावेळी त्यांनी महाप्रसाद वाटप कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. कलासरोहण कार्यक्रमासाठी हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या समन्वयकांनी केले आहे.



Recent Comments