कागवाड तालुक्यातील शेडबाळ शहरातील ज्येष्ठ पत्रकार कुमार पाटील (६५) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,

त्यांच्या पश्चात एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे, विजयवाणी वृत्तपत्राचे रिपोर्टर म्हणून त्यांनी काम पाहिले होते अंत्यसंस्कारप्रसंगी आमदार राजू कागे यांनी दूरध्वनीवरून श्रद्धांजली वाहिली.यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, संघटनांचे पदाधिकारी व जवळचे मित्र सहभागी झाले होते.

कागवाड व अथणी तालुक्यातील कार्यरत पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आदरांजली वाहिली. सोमवारी 11 रोजी सकाळी रक्षा विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे .


Recent Comments