बेंगळुरू शहरात मोफत सैन्य प्रशिक्षण केंद्र निर्मितीसाठी बेंगळुरू येथील भरत नायडू नामक जवानाने कारगिल युद्धभूमीतून माती आणून सैन्य भरती प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्धार केलाय. सायकल यात्रेच्या माध्यमातून कारगिल युद्धभूमीतील माती आणून कारगिल विजयोत्सव दिनाच्या औचित्याने या सैनिकाने हि घोषणा केली आहे.

मूळच्या तुमकूर जिल्ह्यातील तुरुवकेरे या गावातील भरत नायडू या जवानाने भारतीय सैन्यदलात १५ वर्षाहून अधिक कार्यकाळ सेवा बजाविली आहे. विविध राज्यांमध्ये सेवा बजावून निवृत्त झालेल्या या जवानाने आपले वडील चंद्रप्पा नायडू यांच्यासह भारतीय सैन्यदलात सेवा बजाविली आहे. वडिलांच्या प्रेरणेतून भारतीय सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी या जवानाने मोफत सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
९ मार्च रोजी बेंगळुरू येथील गुड्डे अंजनेय देवस्थानाततून सहकार मंत्री एस टी सोमशेखर यांनी या सायकल यात्रेला चालना दिली. चित्रदुर्ग, रायचूर, बिदर या मार्गावरून महाराष्ट्र, जानवी, ग्वालियर, मथुरा, उदंमपूर, जम्मू, श्रीनगर, बालटाल सोनामार्ग या मार्गावरून कारगिल युद्ध भूमीकडे प्रस्थान केले. या युद्धभूमीतील माती आणून पुन्हा परतीचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान या जवानाने आर्मी, BSF, CISF, CRPF, SSB, भारतीय नौदल मधील अनेक जवानांची भेट घेतली.
अनेक ठिकाणी या जवानाचे उत्स्फूर्तपणे स्वागतही करण्यात आले. प्रवासादरम्यान मंदिर, उद्यान, आश्रम अशा अनेक ठिकाणी विसावा घेत आपले ध्येय गाठण्यासाठी या जवानाने प्रयत्न केले. या जवानाचा हा उपक्रम सोशल माध्यमांवरदेखील प्रसिद्ध झाला आहे. २६ जुलै रोजी या जवानाचे बंगळूरमध्ये प्रस्थान झाले असून कारगिल विजयोत्सव दिनाच्या निमित्ताने याठिकाणी स्वागताची जय्यत तयारीही करण्यात आली होती.



Recent Comments