Crime

मूळच्या कोल्हापूरच्या युवकाचा निपाणीत निर्घृण खून

Share

मूळच्या कोल्हापूरच्या युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना निपाणी शहरात रविवारी मध्यरात्री घडली.

अभिषेक दत्तवाडे, वय 22 असे मृत युवकाचे नाव आहे. अभिषेक हा मूळचा कोल्हापूरचा आहे. सध्या तो निपाणीतील निराळी गल्लीत आईसमवेत रहात होता. निपाणीतील एका खासगी चित्रमंदिरात तो काम  करत होता. काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरात घुसून त्याची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आर्थिक व्यवहारातून अभिषेकच्या खून झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे. आणखी २ आरोपी फरारी असून त्यांचा शोध सुरु आहे. निपाणी शहर पोलीस तपास करत आहेत.

 

Tags: