Nippani

निपाणीजवळ पोलीस असल्याचे भासवून वृद्धाला लुटले

Share

निपाणीजवळील शिरगुप्पी रस्त्यावर पोलिस असल्याचे भासवून अज्ञातांनी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका वृद्धाला भामटयांनी लुटले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

या घटनेत भामटयांनी शंकर जानबा सातवेकर यांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या. शनिवारी (ता. १२) सायंकाळी घडलेल्या घटनेची नोंद रविवारी (ता.१३) शहर पोलिस स्थानकात झाली. शंकर सातवेकर हे दररोज सायंकाळी फिरण्यासाठी निपाणी रोडवरुन जातात. शनिवारी सायंकाळी ते फिरून रस्त्याकडेच्या बाकावर बसले होते. या दरम्यान मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा भामटयांनी सातवेकर यांना, आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. त्यांना पुढे असे सांगितले की या आसपास आत्ताच खून झालेला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आपल्या अंगावरील मौल्यवान वस्तू खिशामध्ये ठेवा. त्याला सातवेकर बापुंनी प्रतिकार केला. पण यानंतर पुढील 30 ते 45 मिनिटे भररस्त्यामध्ये असलेल्या बाकड्यावर काय झाले हे सातवेकर यांनाही समजले नाही. काही वेळानंतर तिथून चालत पुढे आल्यानंतर यांच्या हातातील अंगठ्या हिसकावून घेऊन भामट्यांनी पळ काढल्याचे लक्षात आले.

Tags: