Nippani

निपाणीत रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक उघडकीस

Share

निपाणीत तहसीलदार व पोलिसांनी दोन ट्रकवर धाड टाकून ६०.१ टन रेशनचा तांदूळ जप्त केला. या कारवाईत दोन ट्रकसह ४१.७२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईत हुबळीहून गुजरातला जाणारा ३०,१०० किलो रेशनचा तांदूळ व ट्रक जप्त करून मोहम्मद रफीक अत्तार याच्याविरोधात
कोगणोळी टोल नाक्याजवळ केलेल्या दुसऱ्या कारवाईत ३०,००० किलो रेशनचा तांदूळ आणि ट्रक जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्रातील रतन बबन सदानंदे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तहसीलदार सुरेश मुंचे व अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

Tags: