Nippani

निपाणीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षीय बालक गंभीर जखमी

Share

चिकोडी तालुक्यातील निपाणी येथील साईशंकर नगर भागात भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात ११ वर्षांचा एक बालक गंभीर जखमी झाला आहे.

विहान तुषार कांबळे (वय ११) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विहान हा आपल्या घरासमोरील गल्लीत इतर मुलांसोबत खेळत असताना अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्याच्या हाताला, पायाला आणि मांडीला गंभीर चावा घेतला. बालकाचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे पालक आणि शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत कुत्र्यांना पळवून लावले आणि त्याची सुटका केली.

त्यानंतर जखमी विहानला तातडीने उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: