Nippani

निपाणीत ‘श्रीमती शशिकाला जोल्ले शिष्यवृत्ती’ जाहीर

Share

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘श्रीमती शशिकाला जोल्ले शिष्यवृत्ती पुरस्कार २०२७-२८’ उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या २० सर्वोत्तम गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, अशी माहिती जोल्ले ग्रुपचे युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी दिली.

निपाणी येथील स्थानिक शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी या उपक्रमाची संपूर्ण माहिती आणि परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. आर्थिक अडचणींमुळे कोणताही गुणवंत विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबांना आर्थिक हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

निवड चाचणी परीक्षांचे वेळापत्रक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी निपाणी आणि चिक्कोडी, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी रायबाग आणि हारूगेरी, ०६ डिसेंबर २०२६ रोजी कागवाड आणि अथणी तसेच १३ डिसेंबर २०२६ रोजी यमकनमर्डी आणि संकेश्वर येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म द्वारे ऑनलाइन मोफत नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९७३१३०९५५४ किंवा ९६३२९८७५५५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक टंचाई शैक्षणिक प्रगतीत कधीही अडथळा ठरू नये. जोल्ले ग्रुपचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ. शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली ही शिष्यवृत्ती ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास बसवप्रसाद जोल्ले यांनी व्यक्त केला.

Tags: