Belagavi

एशियन पॅरा गेम्समध्ये बेळगावच्या स्वातिक पाटीलची कमाल

Share

जपानमध्ये पार पडलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये बेळगाव तालुक्यातील मुतगा गावच्या स्वातिक पाटीलने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक पोहण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून व्यस्त नोकरी सांभाळत दररोज सहा तासांचा कठोर सराव करून त्याने हे यश संपादन केले आहे. जपानमधील आयची-नागोया २०२६ एशियन पॅरा गेम्सच्या पुरुषांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (SB9) प्रकारात बेळगावचा पॅरा-स्विमर स्वातिक पाटीलने १ मिनिट १३.७७ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदकावर नाव कोरले. नारायण पाटील आणि चांगुणा पाटील यांचा मुलगा असलेल्या स्वातिकने एनआयटी अलाहाबाद येथून शिक्षण पूर्ण केले असून, तो सध्या ‘झापिंग’ कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे.

आपली नोकरी सांभाळत क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या स्वातिकने बेळगावच्या सुवर्णा जेएनएमसी आणि बंगळुरूच्या नेट्कलप्पा स्विमिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल क्रीडाप्रेमी व मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: