‘महसुली दाखले शेतकऱ्यांचा दारी‘ या सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला निपाणी तालुक्यात धर्मादाय, वक्फ आणि हाज खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी चालना दिली.

होय,जनतेला घरबसल्या महसुली दाखले देण्याची अनोखी योजना राज्य सरकारने सुरु केली आहे. निपाणी मतदारसंघात या योजनेचे रविवारी मंत्री शशिकला जोल्ले यांनी आडी गावात उदघाटन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा घरोघरी जाऊन महसुली दाखल्यांचे वितरण केले. फ्लो

यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, राज्यात प्रथमच भाजप सरकारने ही अनोखी योजना आणली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जात व उत्पन्नाचे दाखले आदी महसूल विभागाशी संबंधित दाखले व कागदपत्रे घरोघरी जाऊन देण्यात येणार आहेत. सर्वाना धावपळ न करता, घरबसल्या दाखले मिळणार आहेत. त्यामुळे लोकांची सोय होणार असल्याने ही योजना आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानले. बाईट
यावेळी निपाणीचे तहसीलदार मोहन भस्मे, ग्राम लेखापाल रमेश हंजी, ग्रापं अध्यक्ष बबन हवालदार, उपाध्यक्षा रुपाली पाटील, मलगौंडा पाटील, सिद्धेश्वर पाटील यांच्यासह ग्रापं सदस्य, स्थानिक नेते व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments