पाटबंधारे योजनांच्या अंलबजावणीच्या मुद्द्यांवरून विधानसभेत आज काँग्रेस आ. माजी मंत्री शिवानंद पाटील आणि जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांच्यात कलगीतुरा रंगला.

अधिवेशनाच्या कामकाजाला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाल्यानंतर माजी मंत्री शिवानंद पाटील यांनी, २०१०मध्येच विधानसभेने निर्णय देऊनही कळसा-भांडुरी, म्हादई, अपर कृष्णा योजना का अमलात आणल्या जात नाहीत असा सवाल केला. येडियुरप्पानी आपले सरकार सत्तेवर येताच २४ तासांत या योजना मार्गी लावू अशी घोषणा केली होती. महाराष्ट्राचा तुम्हाला पाठिंबा असूनही तुमचे कायदा पथक काम करत नाहीय का? असा खोचक सवाल केला.

त्यावर जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी ६ वर्षे सत्तेत असलेल्या सरकारला न जमलेले काम आता आमचे सरकार करत आहे असा टोला हाणला. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये २ वेळा दिल्लीला जाऊन महाराष्ट्राच्या मंत्र्यांसह केंद्रीय जलसंसाधन मंत्र्यांशी चर्चा केली आहे. दोन्ही राज्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन गॅझेट जारी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. येडियुरप्पा यांनी बोलल्याप्रमाणे वागून योजनांसाठी १० हजार कोटी रु घोषणा केली आहे असा पलटवार कारजोळ यांनी केला.


Recent Comments