धारवाड येथील सेवा भारती ट्रस्ट आणि मंजुनाथ मक्कगेरि यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वच्छ समाज संकल्पनेखाली सार्वजनिक ठिकाणी असलेल्या देवस्थानातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करत संस्थांना एक आदर्श घालून दिला आहे.

अलीकडेच धारवाड शहरातील हावेरीपेठ येथील विविध देवस्थानासमोरील सार्वजनिक पाण्याच्या टाकीसह आजूबाजूच्या परिसरातील कचरा साफ करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या सामाजिक उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही सक्रिय पाठिंबा दिला असून, स्थानिक पातळीवर या स्वच्छता मोहिमेचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.


Recent Comments