Bagalkot

हिप्परगी ब्रिजजवळ बस खड्ड्यात उलटली… सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Share

बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर खड्ड्यात बस उलटून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जमखंडी येथील परिवहन आगारातील ही बस प्रवाशांना घेऊन जात असताना हिप्परगी ब्रिजजवळ अचानक बसचा स्टिअरिंग रॉड तुटला आणि त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट रस्त्याशेजारील खड्ड्यात जाऊन उलटली.

या बसमध्ये जवळपास ५६ प्रवासी होते. अपघातामध्ये काहींना किरकोळ दुखापत झाली असली तरी कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.

बेळगाव –बागलकोट मार्गावर हा अपघात घडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र, मोठी दुर्घटना टळल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Tags: