Bagalkot

इलकल येथे एका रात्रीत सहा घरफोड्या : किमती ऐवज लांबविला

Share

बागलकोट जिल्ह्यातील इलकल येथे घरफोडयांनी सहा बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. काल रात्री घरफोडयांनी हा कारनामा केला आहे.

इलकल येथे यात्रेनिमित्त रात्री रसमंजरी या करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील लोक घरांना कुलूप लावून सहपरिवार गेले होते.  हीच संधी साधून घरफोडयांनी बंद घरांना टार्गेट केले. घरफोडयांनी बंद घरांचे कडी -कोयंडे तोडून घरात प्रवेश करीत घरातील किमती  ऐवजी लांबावीला.

शरण बसवेश्वर यात्रेनिमित्त शहरातील जे.सी. स्कूलजवळ रात्री उशिरा रसमंजरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक गेले होते.  यावेळी चोरट्यांनी कुलूप बंद घरांना आपले लक्ष्य बनविले. रात्री सुमारे बारा ते एक वाजण्याची सुमारास घरफोडयांनी तीन घरे पडली आणि तेथील सोन्या-चांदीचा किमती ऐवज लांबविला.

दरम्यान त्यांनी आणखीन तीन घरे फोडली. मात्र तिथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही.  घरफोडयांनी एकंदर सहा घरे फोडून 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 200 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू असा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.

कार्यक्रम आटोपून घरी आल्यानंतर लोकांना घरफोडीचा प्रकार लक्षात आला. त्वरित पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली. पोलिसांनी ठस्से तज्ज्ञ आणि श्वान पथकासह घटनास्थळी येऊन पंचनामा केला. डीवायएसपी विश्वनाथ कुलकर्णी आणि सीपीआय सनील सवदी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घरफोडयांचा तपास करीत आहे.

Tags: