Kagawad

कागवाडमध्ये तालुका प्रशासनाकडून क्रांतिकारी संगोळी रायण्णा यांच्या ज्योतीचे भव्य स्वागत

Share

क्रांतिकारी संगोळी रायण्णा यांच्या जयंती निमित्त नंदगड येथून आलेल्या रायण्णा ज्योतीचे कागवाडमध्ये तालुका प्रशासनाचे प्रमुख, तहसीलदार राजेश बुरली यांच्या नेतृत्वात, विविध सरकारी विभागाच्या अधिकार्यांनी आणि कन्नड रक्षण वेदिका तसेच कन्नड प्रेमी संघटनांनी भव्य स्वागत केले.

गुरुवारी दुपारी कागवाडच्या राणी चन्नम्मा सर्कलमध्ये रायण्णा ज्योती रथाचे आगमन झाले . तहसीलदार राजेश बुरली , तालुका पंचायत अधिकारी वीरण्णा वाली , क्षेत्र शिक्षण अधिकारी एम.आर. मुंजे , सीडीपीओ संजू कुमार सदलगे, करवे कार्यकर्ते, कन्नड प्रेमी संघटनांचे सदस्य, कुरुबर समाजाचे प्रमुख तसेच विविध शाळांच्या विद्यार्थी यांच्या उपस्थितीत रायण्णा ज्योती रथाचे स्वागत करण्यात आले.

तहसीलदार राजेश बुरली यांनी ज्योतीची पूजा करून बोलताना सांगितले कि, या “राज्य सरकारने संगोळ्ली रायण्णा यांची जयंती भव्यदिव्य पद्धतीने साजरी करण्यासाठी जिल्ह्यात ज्योती मिरवणूक आणि रथ यात्रा सुरू केली आहे. निप्पानी मार्गाने कागवाडकडे येणाऱ्या या रथाचे आम्ही सर्वजण स्वागत करत आहोत. कागवाड मार्गे मंगसुळी आणि अथणी शहरांकडे हा रथ पुढे जाईल,” असे सांगितले.

कार्यक्रमात प्रदेश कर्नाटक कुरबुर समाजाचे जिल्हा संचालक सदाशिव पूजारी, तालुका अध्यक्ष प्रकाश डंग, रावसाब जुगले, कित्तूर कर्नाटक सेनेचे पदाधिकारी साहुकार, रवी पाटील, सूरज कोरे, सिद्दू ओडेयर, बसवराज मगदूम , महावीर पाटील, रवी पाटील, अरुण जोशी आणि शांतिनाथ करव यांच्यासह अनेक स्थानिक संस्थांचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: