Bailahongala

बैलहोंगल येथील महागणपतीचे विसर्जन : आम. यत्नाळांची उपस्थिती

Share

बैलहोंगल येथील २१ दिवसाच्या गणपतीचे विसर्जन काल पार पडले असून यावेळी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी उपस्थित राहून गणपतीचे दर्शन घेतले.

बेळगाव तालुक्यातील बैलहोंगल तालुक्यात २१ दिवसांचा महागणपती प्रतिष्ठापित केला जातो. या महागणपतीचे विसर्जन शुक्रवारी करण्यात आले. विसर्जन कार्यरकामादरम्यान विजयपुराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी महागणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार यत्नाळ यांचा सत्कार केला.

यावेळी आमदारांनी येथील कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या समाधीला भेट देऊन अभिवादन केले. त्यांच्यासोबत हरीश पुंजा हेदेखील उपस्थित होते.

Tags: