नगराध्यक्ष इम्रान मोमिन म्हणाले की, विश्वकर्मा यांचे विश्वातील योगदान मोठे आहे. आज हुक्केरी शहरात विश्वकर्मा समुदायातर्फे आयोजित विश्वकर्मा प्रतिमेच्या शोभायात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. हुक्केरी शहरातील अडवी सिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात समाजाचे अध्यक्ष गजानन बडिगेर व नगर उपाध्यक्ष ज्योती बडिगेर यांनी विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात केली.

नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना के.ए. बडिगेर म्हणाले कि, विश्वकर्मा यांनी वास्तुशिल्पाच्या माध्यमातून सर्व वर्गातील लोकांपर्यंत आपली कला पोहचवली आणि आणि सर्व लोकांचे प्रेम मिळवले. ट्रस्टचे अध्यक्ष के.बी.बडिगेर यांची भाषणे झाली शासन स्तरावर दरवर्षी विश्वकर्मा जयंती साजरी करणे ही आनंदाची बाब असल्याचे सांगून ते म्हणाले, जगात अनेक सुंदर व प्रसिद्ध वास्तू जातीधर्माशिवाय उभ्या केलेल्या शिल्पकारांमुळे आज देशभरात विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे.
वाद्यांसह निघालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून प्रशासकीय इमारतीत सभेत रूपांतरित झाली. यावेळी ग्रेड 2 चे तहसीलदार प्रकाश कल्लोळी, बीईओ प्रतिभा पाटील, पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे, विश्वकर्मा समाजाचे नेते गजानन बडिगेर, के.बी.बडिगेर, नारायण बडिगेर, महादेव बडिगेर, अजित बडिगेर, संतोष बडिगेर, गणपति बडिगेर, उपस्थित होते.


Recent Comments