Hukkeri

ख्रिस्ती बांधवांसाठी गंगरेड्डी कुटुंबियांकडून प्रार्थना स्थळाची उभारणी

Share

हुक्केरी येथील गंगरेड्डी आणि करनिंग या कुटुंबीयांनी संकेश्वर नगर येथील ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना स्थळाची उभारणी केली आहे.

गोदाबाई फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चून सुसज्ज असे सामूहिक प्रार्थना स्थळ बांधून नवीन गंगरेड्डी यांनी संकेश्वर नगरमधील ख्रिश्चन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. आज या प्रार्थना स्थळाचे उद्घाटन बेळगाव वनखात्याचे सुरेश बेल्लीकट्टी यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ख्रिश्चन नेते डी.एस. पेडणेकर, आसिस एस. बी. एसबी, हेसिकल जाकाब, नवीन गंगरेड्डी, शरद जाधव, शाम सोलोमन, जी. एस. आंटीन, निखिल गंगरेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कविता गंगरेड्डी यांनी सांगितले, आपल्या आजीचा देवावर असलेला विश्वास आणि श्रद्धेपोटी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रार्थना स्थळाची उभारणी करण्यात आली आहे.

वकील विक्रम कारनिंग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, अत्यंत गरिबीत जन्मलेल्या कुटुंबातील नवीन गंगरेड्डी यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ हे प्रार्थना स्थळ उभारून एक आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी सामुदायिक प्रार्थना पार पडली. उपस्थितीतांनी गंगरेड्डी कुटुंबातील सदस्यांचे आभार मानले. यावेळी बेळगाव डीएचओ डॉ.एस.एस.गडेद, चिक्कोडी जिल्हा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी.ए.कुंभार, डॉ.शांताराम बागेवाडी, ऍड. के.बी.कुराबेट, डॉ. निकिता गंगरेड्डी, शरद जाधव, कुरेन ओमन, रवी हालगडीगी आदी उपस्थित होते.

Tags: