हुक्केरी तालुक्यातील हुनुर गावाच्या रस्त्याच्या कडेला जुगार खेळणाऱ्या करगुप्पी गावातील १३ जणांना यमकनमर्डी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी व त्यांच्या सहकाऱ्यानी धाड टाकून , पत्ते खेळत असलेल्या करगुप्पी येथील मनोज पुंडे, सत्यप्पा जोरली, रमेश नाईक, अजेया पुजेरी, भीमाप्पा गुटगुडी, मारुती जोरली, आनंद जडगी, मंजुनाथ मकाली, जे. पी मगेनवर, लगमन्ना पुजेरी, प्रभू मगेनवर, सुरेश मालगी यांना अटक करून त्यांच्याकडून २३,२०० रुपये जप्त करून न्यायालयाच्या ताब्यात दिले.


Recent Comments