कुडलसंगमचे बसव जयमृत्युंजय स्वामी यांनी कर्नाटक सरकारमध्ये कार्यरत असलेले पंचमसाली मंत्री आणि आमदार यांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

हुक्केरी शहरातील लिंगायत पंचमसाली वकिलांच्या बैठकीत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बसव जय मृत्युंजय महास्वामीनी , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि मंत्री शिवानंद पाटील यांच्या विरोधात अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली . राज्य सरकारमधील पंचमसाली समाजाचे दोन्ही मंत्री आणि 20 आमदार नाराज आहेत. अधिवेशनात पंचमसाली आरक्षणाबद्दल सभापती बोलण्याची संधी देत नसल्याने मंत्री आमदारांनी सभात्याग करायला हवा होता , नाहीतर मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरायला हवा होता . राज्यातील पंचमसाली लिंगायत वकिलांचे अधिवेशन 22 सप्टेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
येत्या काळात कायदेशीर लढाई लढण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर हुक्केरीत पंचमसाली लिंगायत वकिलांची बैठक घेऊन पंचमसाली आरक्षणाच्या बाजूने घोषणाबाजी केली. यावेळी वकील काडप्पा कुरबेट , सी एम सवसुद्दी, बी.एम. जिनराळे, बी.एस.हळीजोल, ए.एस. हुल्लोल्ली, बुगडीकट्टी, विनय पाटील, बासू पाटील, बी आय अलगुरे, बी.एस.शिंदीहट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments