चन्नम्मन कित्तूर शहरातील सोमवार पेठेतील बेल्लद गल्लीतील एमएसएल दारूचे दुकान अन्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी प्रवीण सरदार यांनी केली आहे.
कित्तूर येथील पर्यटन मंदिरात पत्रकारांशी बोलताना प्रवीण सरदार म्हणाले कि , यापूर्वी जनस्पंदन कार्यक्रमादरम्यान दारूचे दुकान स्थलांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आमदार यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. येथील दारूच्या दुकानासमोर महिला, वृद्ध व लहान मुले ये-जा करीत असल्याने त्यांना त्रास होतो. येत्या 200 व्या कित्तूर विजय दिन सभेपूर्वी हे दुकान हटवावे , अन्यथा सभेच्या दिवशीच लढा देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Recent Comments