Kittur

नेसरगी येथे श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे जनजागृती कार्यक्रम

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील नॆसर्गि येथे क्रिस्ट निवास येथे श्रमिक अभिवृद्धी संघाच्यावतीने जनजगृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मानस सिक्रम संस्था आणि श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनजागरण संस्थेचे संस्थापक जो चनकला यांनी महिलांनी एकवटून आंदोलन केले पाहिजे, महिलांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे, स्त्री-पुरुष भेदभाव मिटला पाहिजे यासाठी जनजगृती करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ऍड. श्रीमती सुनीताला होण्णन्नावर यांनी समाजात करण्यात येत असलेल्या स्त्री पुरुष भेदभावाबाबत तसेच महिलांवरील अन्यायाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात होणारे अन्याय आणि यावरील कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास फादर टॉम चनकला, जिल्हा संयोजक ऍंथोनी, संतोष सिद्दण्णावर, यशवंत, निंगाप्पा, नेसरगी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: