Athani

अथणी तालुक्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक – एकाचा मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कोहल्ली गावात दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

अथणी तालुक्यातील कोहल्ली गावात काल रात्री उशिरा झालेल्या या अपघातात कोहल्ली गावातील लयप्पा पुंडलीक मरगाळे (४५) यांचा मृत्यू झाला. दुसरा दुचाकीस्वार मल्लप्पा गुरुबसू मंटूर हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ऐगळी पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत.

Tags: