Kagawad

कृष्णा नदीकाठच्या जनता जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर : आ . राजू कागे

Share

कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये आजही पाणी वाढत आहे. त्यामुळे सुमारे एक हजार गुरे व लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आमदार राजू कागे यांनी दिली.

कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी सांगितले की, कृष्णा नदीकाठावरील कृष्णा-कित्तूर, बनिजवाड, कात्राळ या गावांमध्ये अजूनही नदीचे पाणी वाढत असून सुमारे 1000 गुरे आणि 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सर्वतोपरी मदत केली जात आहे.

आमदारांनी मंगळवारी सकाळी तीन गावांना भेट देऊन तेथील बाधितांच्या समस्या ऐकून घेतल्या. आमदार राजू कागे यांनी माहिती देतानासांगितले कि , महाराष्ट्रातील पाण्याचा विसर्ग थोडासा कमी झाला आहे. मात्र कागवड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची किंचित वाढ होते. येथील लोकांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी त्यांची समजूत काढून , त्यांना सुरक्षित स्थळी व काळजी केंद्रात हलवून त्यांना अन्न व इतर सुविधा दिल्या जात आहेत.

कृष्णा-कित्तूर, बनिजवाड आणि कात्राळ गावातील सुमारे एक हजार म्हशी आणि गायींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीडितांना दैनंदिन साहित्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एक-दोन दिवसांत पाणी ओसरेल, असा विश्वास आमदार राजू कागे यांनी व्यक्त केला.

कागवडचे तहसीलदार राजेश बुर्ली व प्रत्येक गावाचे ग्रामविकास अधिकारी, ग्राम लेखाधिकारी यांनी सर्व माहिती आमदारांना दिली. पीकेपीएस अध्यक्ष विश्वनाथ पाटील, यमनू पाटील, अप्पू हुलगबाळी, शिवानंद अर्जुनवाड, अण्णासाहेब जयगौडा, विद्याधर सुतार, राजू मदने, संजय सलगरे, नोडल अधिकारी भरत टोनगे, कांतिनाथ बिरादर, ग्राम महसूल अधिकारी प्रकाश पुठाणे, आशासाहेब सुतार, विद्याधारा सत्तीकर, रवी हलप्पन्नावर , अण्णाप्पा भोसगी, राजेंद्र दानोल्ली, कुमार कांबळे, गंगूबाई शिंदे आणि इतर अनेकजण तिथे होते.

Tags: