अथणी तालुक्यातील हल्याळ ते दरुर गावादरम्यानच्या पुलावर सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती . खबरदारीच्या दृष्टीने पोलीस त्यांना हुसकावून लावण्यासाठी धडपडत होते .

हल्याळ ते दरुर गावादरम्यानच्या पुलावर कृष्णानदीचा पूर पहाण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमली होती . पुलाच्या कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी सर्वांची लगबग सुरु होती . जरा तोल गेला तरी थेट कृष्णां नदीच्या पाण्यातच … मात्र लोक त्याची पर्वा न करता अगदी बिनधास्त वागत होते . स्त्रिया देखील लहान मुलांना घेऊन पुलावर पूर पाहण्यासाठी आल्या होत्या. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस पुलावरील लोकांना हुसकावून लावत होते . तरीदेखील लोक ऐकत नव्हते . त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू होती.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत असून नदीलगतचे नागरिक चिंतेत आहेत. तालुका प्रशासन आपले काम प्रामाणिकपणे करत असून काही पूरग्रस्त घरांना भेटी देऊन लोकांना तेथून बाहेर काढण्यात तालुका प्रशासनाला यश आले आहे.


Recent Comments