Khanapur

रामगुरवाडी ग्रामस्थांचे अभिनव पद्धतीने आंदोलन

Share

खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी गावातील जांबोटी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आज रामगुरवाडी ग्रामस्थांनी खड्ड्यात भात रोवून अभिनव पद्धतीने आंदोलन छेडले.

रामगुरवाडी गावापासून खानापुर जांबोटी महामार्गापर्यंतचा रस्ता लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वी विकसित करण्यात आला होता. मात्र लाखो रुपये खर्चून देखील रस्त्याची झालेली दुरवस्था पाहिल्यास हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. सदर बाब लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणूनही उपयोग झाला नाही. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे. वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर नागरिकांनी खड्ड्यात भात रोवून आंदोलन केले.

संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: