Khanapur

“सिंगीनकोप शाळेत खानापूर म ए युवा समिती यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप”

Share

खानापूर तालुक्याच्या सीमाभागातील मराठी शाळाना बळकटी यावी, मराठी शाळा टिकल्या पाहिजे तसेच विद्यार्थ्यानी मातृभाषेतुन शिक्षण घ्यावे.या उद्देशाने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण Left समिती यांच्यावतीने सिंगीनकोप (ता. खानापूर )येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी दि.८ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्राम पंचायत सदस्य व म ए समितीचे नेते कृष्णा कुंभार होते.
प्रास्ताविक अतिथि शिक्षक नामदेव कुंभार यानी केले.तर मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यानी केले.
यावेळी बोलताना शरद पाटील म्हणाले की, मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकणार आहे.त्यामुळे मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वानी कटिबद्ध राहुन विद्यार्थ्याना मातृभाषेतुन शिक्षण घेण्यासाठी प्रोहत्सान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

तर माजी ग्राम पंचायत सदस्य व समिती नेते कृष्णा कुंभार म्हणाले की,खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समिती च्या कार्यकर्त्यानी गेल्या ९ वर्षापासुन तालुक्यातील मराठी शाळाना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मराठी शाळा टिकविण्याचा प्रयत्न करत आहे.त्याबद्दल कार्यकर्त्याचे अभिनंदन केले.अशीच समाजभिमुख कामे करून मराठी भाषेचा जागर करू असे आवाहन केले.

यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने विद्यार्थ्याना वह्या, पेन, पेन्सिल, अंकलिपी पुस्तक किट तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी कार्य़क्रमाला खानापूर तालुका महाराष्ट्र युवा समितीचे कार्यकर्ते शरद पाटील, श्रेयस निट्टूरकर,शुभम कांबळे,सुदेश घाडी,आकाश घाडी,आदित्य कांबळे,प्रसन्ना पाटील,मुकेश गुरव, श्रीहरी पाटील मुख्याध्यापक प्रकाश कुंभार, शिक्षिका सौ.एल डी.नलवडी, अतिथी शिक्षक नामदेव कुंभार व विद्यार्थी उपस्थित होते.
आभार शिक्षिका सौ.एल डी नलवडी यानी मानले.

Tags: