खानापूर तालुक्यातील बेकवाड-कडतनबागेवाडी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात टिप्पर अडकल्याने वाहतूक ठप्प झाली. यावर संतापलेल्या नागरिकांनी खड्ड्यात झाड लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला.


खानापूर तालुक्यातील बेकवाड ते कडतनबागेवाडीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून दररोज प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. बेकवाड ग्रामपंचायतीजवळच रस्त्याच्या मधोमध पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात अवजड टिप्पर अडकला. यामुळे या मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळेसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.

अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात झाड लावून ‘वनमहोत्सव’ साजरा करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या मार्गावरून रोज शेकडो वाहने अत्यंत धोकादायक स्थितीत ये-जा करत आहेत. तरीही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.


Recent Comments