चातुर्मासात, सर्व जैन संत आपला प्रवास थांबवतात आणि मंदिर, आश्रम किंवा संत निवासस्थानी राहून यम आणि नियम पाळतात. जैन धर्मानुसार हे चार महिने उपवास, ध्यान आणि तपश्चर्यामध्ये घालवले जातात आणि या काळात आपण कठोर नियम पाळतो, असे पंचम पठाधीश राष्ट्रगौरव आचार्य श्री वर्धमानसागरजी मुनी महाराजांचे परम शिष्य श्री 108 मुनिश्री क्षेमसागरजी महाराज, म्हणाले.

ऐनापूर येथील भगवान 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात पावन वर्षायोग चातुर्मासानिमित्त कलश प्रतिष्ठापना कार्यक्रमात शनिवारी आशीर्वाद देताना मुनीजी म्हणाले.

पावसाळ्याच्या चार महिन्यांत पावन वर्षायोग साजरा केला जातो. वर्षायोगाच्या काळात निसर्गात अनेक जीव निर्माण होतात. मुनी जेव्हा पायी चालतात तेव्हा जीव त्यांच्या पावलावर येतात आणि त्यांची हानी होते . हे हिंसक आहे. त्यामुळे चार महिने मंदिरांमध्ये प्रवचन देऊन सर्वांना भक्तीमार्ग दाखवावा हा ऋषीमुनींचा उद्देश आहे.
108 मुनिश्री क्षेमसागरजी आणि मुनिश्री देवधरसागरजी यांनी महाराजांच्या चरणी पूजन करण्यापूर्वी शास्त्रवचन केले. 11 भाविकांनी कलशाची प्रतिष्ठापना केली.
आदिनाथ जैन मंदिराच्या चातुर्मास समितीचे सर्व सदस्य व श्रावक-श्राविकांनी भक्तीभावाने कलश प्रतिष्ठापना केली .
यामध्ये कलकत्ता येथील श्रावक अजित पाटील आणि चिक्कोडी येथील शांतीनाथ शेट्टी यांनी मुनिमहाराजांची पाद्यपूजा केली. समस्थ ऐनापुर शहरातील जैन बांधवांनी सहभाग घेऊन चातुर्मास निमित्त कलश प्रतिष्ठापन कार्यक्रम यशस्वी केला.


Recent Comments